monsoon : मुंबईकरांसाठी खास बातमी! तर शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा?, कुठ पावसाचा फटका; तर कुठं उष्णतेची लाट
राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा धोक्याची घंडा वाजली आहे. येत्या पाच दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात वळवाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. तर आता राज्यात काही ठिकाणी वळवाच्या सरीवर सरी बरसतील, तर काही ठिकाणी उष्णतेची लाट सहन करावी लागणार आहे.
मुंबई : सध्या राज्याच्या अनेक भागात उष्णतेच्या झळा बसत आहेत. तर अनेक ठिकाणी पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याचदरम्यान हवामान विभागानं दिलासा दायक बातमी दिली आहे. मान्सूनची आगेकूच सुरू असून केरळमध्ये 4 जून तर 10 जूनपर्यंत मॉन्सून कोकण आणि मुंबईत दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे सकाळ होताच घामांच्या धारा वाहणाऱ्या मुंबईकरांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा धोक्याची घंडा वाजली आहे. येत्या पाच दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात वळवाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. तर आता राज्यात काही ठिकाणी वळवाच्या सरीवर सरी बरसतील, तर काही ठिकाणी उष्णतेची लाट सहन करावी लागणार आहे. हवामान खात्याने विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. या तीन दिवसांत सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेही मुंबई, कोकण पट्ट्यांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे उकाडादेखील वाढला आहे. मात्र, दुपारी दोनपर्यंत उष्णतेच्या झळा असल्या तरीही त्यानंतर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याचीही शक्यता आहे.