दिव्यांग मंत्रालय तर दिले पण त्या मागणीचे काय? बच्चू कडू उपोषणाला बसणार

दिव्यांग मंत्रालय तर दिले पण त्या मागणीचे काय? बच्चू कडू उपोषणाला बसणार

| Updated on: Sep 07, 2023 | 6:51 PM

राज्यात दिव्यांग कल्याण मंत्रालयाची स्थापना झाली. त्यानंतर दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू महाराष्ट्रात फिरत आहेत. नंदुरबार येथे दिव्यांगांच्या दारी अभियान कार्यक्रमात बोलताना त्यांनी सरकार विरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला.

नंदुरबार : 7 सप्टेंबर 2023 | मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. सरकारकडून आरक्षणाची घोषणा करूनही उपोषण मागे घेण्यात आलेलं नाही. तर दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनीही सरकार विरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे. कुणबी हा मराठा आहे आणि मराठा हाच कुणबी आहे. आम्ही देखील मराठा आहोत. मराठा हे नाव एका जातीच्या नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र प्रांताचे आहे. महाराष्ट्रात जे जे राहतात ते सर्व मराठी आहेत असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय दिले. तरीही आपली आणखी एक मागणी आहे. दिव्यांग यांचा गेल्या 70 ते 75 वर्षाचा अनुशेष शिल्लक आहे. तो मिळविण्यासाठी विविध काम करावे लागणारा आहे. गुवाहाटीला गेल्याने आम्ही बदनाम झालो. ५० खोक्याचे आरोप झाले. पण, आम्ही कुणाला सांगावे ५० कोटी कधी आणि कसे घेतले, असा टोला त्यांनी लगावला. नंदुरबार येथे दिव्यांगांच्या दारी अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.

Published on: Sep 07, 2023 06:51 PM