Special Report | शाहांच्या मुंबई दौऱ्यात यंत्रणांचं दुर्लक्ष झालं?

| Updated on: Sep 08, 2022 | 10:47 PM

झेड प्लस सुरक्षेत 10 एनएसजी कमांडो, पोलीस अधिकाऱ्यांसहीत 55 सुरक्षारक्षक त्याशिवाय एस्कॉर्ट आणि पायलट वाहनं असतात. मात्र इतक्या तगड्या सुरक्षेचं कवच भेदून एक व्यक्ती अनेक तास गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावेळी त्यांच्या आजूबाजूला फिरत असल्याचं समोर आलंय.

मुंबई : सत्ताबदलानंतर पहिल्यांदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले आणि त्याच दौऱ्यात सुरक्षायंत्रणांकडून घडलेली एक चूक चर्चेचा विषय बनली. वास्तविक अमित शाहांना झेड प्लस दर्जाची सिक्युरिटी आहे. जी सिक्युरिटी SPG नंतरची सर्वात कडक सिक्युरिटी कव्हर म्हणून मानली जाते. झेड प्लस सुरक्षेत 10 एनएसजी कमांडो, पोलीस अधिकाऱ्यांसहीत 55 सुरक्षारक्षक त्याशिवाय एस्कॉर्ट आणि पायलट वाहनं असतात. मात्र इतक्या तगड्या सुरक्षेचं कवच भेदून एक व्यक्ती अनेक तास गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावेळी त्यांच्या आजूबाजूला फिरत असल्याचं समोर आलंय. जो व्यक्ती गृहमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरत होता, त्याच्या हातावर गृहमंत्रालयाचा एक बँड सुद्धा होता. काही रिपोर्टनुसार हा व्यक्ती अमित शाहांच्या दौऱ्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर सुद्धा ब्लेझर घालून फिरत होता.

Published on: Sep 08, 2022 10:47 PM