उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांवर आता भाजपची करडी नजर

उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांवर आता भाजपची करडी नजर

| Updated on: Jan 21, 2023 | 3:06 PM

विरोधकांनी सरकार पडणार आहे, असे होणार आहे, अपात्र होणार आहे अशी बडबड करण्यापेक्षा जे सरकार आले आहे त्यांच्याकडून काय चांगलं करता येईल याची काळीज घ्यावी. 

जालना : सकाळी सकाळी प्रेसमध्ये येऊन रोज रोज टोमणे मारण्यात काही फायदा नाही. महाराष्ट्र विकासाची वाट बघत आहे. जेवढे दिवस आहे तेवढे दिवस विरोधकांनी विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका पार पाडावी, असा चिमटा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( CHANDRASHEKHAR BAVNKULE ) यांनी संजय राऊत ( SANJAY RAUT ) यांना लगावला आहे.

महाराष्ट्राबद्दल आणि विदर्भ, मराठवाडा याबद्दल काय चांगलं करता येईल याची सुचना विरोधकांनी केल्या तर चांगले होईल. रोज टोमणे मारण्यापेक्षा अधिक काय करत येईल हे पहावे असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असलेले काही आमदार शिंदे यांच्यासोबत गेले. आता जे काही उरले आहेत ते आमच्या संपर्कात आहेत. आमच्याकडे येण्याच्या तयारीत ते आहेत. त्यांना आपल्याकडे थांबविण्यासाठी ठाकरे यांना काही तरी करावे लागते. त्यासाठी सरकारवर आरोप करण्याचे उद्योग सुरु आहेत अशी टीका त्यांनी केली.

Published on: Jan 21, 2023 02:36 PM