शिंदे गटाच्या उर्वरित 24 आमदारांकडून एकच उत्तर; आमदार म्हणतात, ‘आम्हीच खरी…’
तर अपात्रेबाबत उत्तर देण्याचे सांगितलं होतं. त्याला त्यांनी ७ दिवसांची मुदत दिली होती. मात्र आता हि देखील मुदत संपली आहे. यादरम्यान शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे उत्तर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई | 19 जुलै 2023 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली होती. तर अपात्रेबाबत उत्तर देण्याचे सांगितलं होतं. त्याला त्यांनी ७ दिवसांची मुदत दिली होती. मात्र आता हि देखील मुदत संपली आहे. यादरम्यान शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे उत्तर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शिंदे गटाकडून अपात्र असणाऱ्या १६ यांनी हे उत्तर दाखल केलं नसून उर्वरीत २४ आमदारांकडून याबाबत उत्तर पाठवण्यात आल्याचं समोर येत आहे. विशेष बाब म्हणजे या उत्तरात शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना आपणच खरी शिवसेना असल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर हे उत्तर देताना शिंदे गटाच्या आमदारांना आपलाच व्हीप देखील लागू असेल असेही उत्तरात म्हटलं आहे. तर याचदरम्यान ठाकरे गटाकडून देखील अपात्रेबाबत उत्तर देण्यात आल्याचं कळत आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून आता विधानसभा अध्यक्षांना उत्तरे पाठवण्यात आली असून त्यावर आता अध्यक्ष आता कोणता निर्णय घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.