श्रेय मिळू नये म्हणून आंदोलन चिरडले जातंय, ठाकरे गटाच्या खासदाराचा मोठा आरोप

श्रेय मिळू नये म्हणून आंदोलन चिरडले जातंय, ठाकरे गटाच्या खासदाराचा मोठा आरोप

| Updated on: Nov 01, 2023 | 11:59 PM

सध्या सरकार विशेष करून भाजपामधून लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात येत आहेत. त्यांच्याकडे गेलेल्या लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. गद्दारांच्या सतरंज्या उचलण्याचे काम त्यांना करावे लागले म्हणून मोठ्या संख्येत लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येत आहेत.

मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षण संदर्भात आंदोलन चिघळत असताना मनोज जरांगे यांच्या जीवाची काळजी सरकारला नाही. सरकारला त्याचे काहीच देणं घेणं नाही. तरुण मुलं आत्महत्या करत आहेत. मात्र, सरकारचे याकडे लक्ष नाही. या घटनेचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही महामहीम राष्ट्रपती यांना पत्र लिहिलं आहे. संसदेच्या विशेष अधिवेशन बोलवण्याची विनंती केली आहे. त्यांची वेळ मागितली आहे असे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. सरकार आंदोलन द्वेष्टा आहे. मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांना श्रेय मिळू नये असा प्रयत्न आहे. म्हणूनच 307 सारखे गंभीर कलम आंदोलन कर्त्यावर दाखल केला जात आहे. स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फोन करून किंवा मीडियाला माहिती देत आहेत. मनोज जरांगे यांचे आंदोलन सरकारला चिरडायचा आहे, असेही ते म्हणाले.

Published on: Nov 01, 2023 11:59 PM