खासदारांनी दिले आमदारांना पक्षात येण्याचं आमंत्रण, आमदार म्हणाले तुम्हीच या...

खासदारांनी दिले आमदारांना पक्षात येण्याचं आमंत्रण, आमदार म्हणाले तुम्हीच या…

| Updated on: Oct 15, 2023 | 11:19 PM

खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या मैत्रीची चर्चा शहरात असते. मात्र, जाहीर कार्यक्रमात सुजय विखे यांनी दिलेला आमंत्रणामुळे शहरात चर्चेला उधाण आलं आहे. जिल्ह्यात सध्या या दोघांच्या विधानांची जोरदार चर्चा सुरू आहे.

अहमदनगर : 15 ऑक्टोबर 2023 | अहमदनगरचे भाजप खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार अरुण काका जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांना भाजपमध्ये येण्याचा आमंत्रण दिलं आहे. त्यावर आमदार संग्राम जगताप यांनी देखील विखे विनोदाने बोलत असले तरी आम्ही त्याला गांभीर्याने घेतो. आम्ही काही तिकडे येत नाही पण तुम्हीच राष्ट्रवादीत यावं असे आमंत्रण आमदार जगताप यांनी विखेंना दिले. तसेच विखेंनी राष्ट्रवादीकडूनच पुढची लोकसभा लढवावी असे आवाहनही संग्राम जगताप यांनी केलंय. शब्दगंध साहित्य कार्यक्रमात सुजय विखे यांनी माजी आमदार अरुण जगताप आणि आमदार संग्राम जगताप या पिता पुत्रांना भाजप सेनेचा आव्हान केलं होतं. त्यावर आमदार संग्राम जगताप यांनी पलटवार केलाय.

Published on: Oct 15, 2023 11:19 PM