दिल्लीमधील नेहरु मेमोरिअल म्युझियमची ओखळच बदलली आता असेल 'हे' नवीन नाव

दिल्लीमधील नेहरु मेमोरिअल म्युझियमची ओखळच बदलली आता असेल ‘हे’ नवीन नाव

| Updated on: Jun 17, 2023 | 7:30 AM

याच्याआधी देखील मोदी सरकारकडून अनेक ऐतिहासिक वास्तू, रस्ते व शहरांची नावे बलण्यात आली आहेत. तर यापूर्वीही मोदी सरकारने पंडित नेहरूंनी सुरू केलेल्या योजना आयोगाचे नामकरण निती आयोग केले होते.

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला. ज्यामुळे काँग्रेसकडून आता भाजपवर निशाना साधत टीका होताना दिसत आहे. येथील नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे नाव बदलण्यात आले आहे. आता ते ‘पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय’ म्हणून ओळखले जाईल. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यावरून टीका करताना, मोदी हे संकुचित वृत्ती आणि सूडबुद्धीचे दुसरे नाव असल्याचं म्हटलं आहे. याच्याआधी देखील मोदी सरकारकडून अनेक ऐतिहासिक वास्तू, रस्ते व शहरांची नावे बलण्यात आली आहेत. तर यापूर्वीही मोदी सरकारने पंडित नेहरूंनी सुरू केलेल्या योजना आयोगाचे नामकरण निती आयोग केले होते. आता नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे नाव बदलण्यात आले आहे.

Published on: Jun 17, 2023 07:30 AM