मणिपूरच्या मुद्यावरून केंद्र सरकारची कोंडी; सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयार आहेत. सध्या मणिपूर हिंसाचारावरून विरोधकांची बैठक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात सुरू आहे. तर या बैठकीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आणि ठाकरे गटाचे खासदार देखील उपस्थित आहेत.
नवी दिल्ली, 26 जुलै 2023 | मणिपूरमध्ये मागील काही महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही देखील पाहायला मिळत आहेत. मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरून विरोधक केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत. सध्या मणिपूर हिंसाचारावरून विरोधकांची बैठक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात सुरू आहे. तर या बैठकीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आणि ठाकरे गटाचे खासदार देखील उपस्थित आहेत. तर केंद्रातील भाजप सरकार हे मणिपूर हिंसाचारावर बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप काँग्रेससह विरोधीपक्षांकडून करण्यात येत आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी सभागृहात मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर भाष्य करण्याची मागणी केली गेली. या मुद्द्यांवर राज्यसभेत सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. तर याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चेला तयार असल्याचे विरोधकांना कळवले आहे.