Dharavi Redevelopment Project | मोदानी हटाव, धारावी बचाव; अदानी ग्रुपच्या धारावी पुनर्विकासस विरोधकांचा विरोध
गेल्या आठवड्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपाहार्य व्हिडिओवरून चांगलाच गदारोळ झाला होता. तर यानंतर महिला सुरक्षा, मणिपूर हिंसाचार, शिक्षक भरती, रोहित पवार आंदोलन, शेतकऱ्यांचे प्रश्न यासह कंटात्री पोलीस भरतीचा मुद्दा चांगलाच गाजला.
मुंबई, 27 जुलै 2023 | राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू असून विरोधकांनी सभागृहात सरकारला घेरलं आहे. गेल्या आठवड्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपाहार्य व्हिडिओवरून चांगलाच गदारोळ झाला होता. तर यानंतर महिला सुरक्षा, मणिपूर हिंसाचार, शिक्षक भरती, रोहित पवार आंदोलन, शेतकऱ्यांचे प्रश्न यासह कंटात्री पोलीस भरतीचा मुद्दा चांगलाच गाजला. यानंतर आज काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी नई चलेगी नई चलेगी तानाशाही नई चलेगी, मोदानी हटाव, धारावी बचावच्या घोषणा देण्यासह अदानी यांच्या प्रोजेक्टला विरोध करण्यात आला. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे टेंडर राज्य सरकारने अदानी ग्रुपला दिले आहे. तर अदानी ग्रुपने हे टेंडर पाच हजार कोटींची बोली लावून खिशात घातले आहे. त्यानंतर आता विरोधकांना या प्रकल्पावरून अदानी ग्रुपला विरोध करताना घोषणाबाजी केली आहे. यावेळी काँग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.