Deepali Syyed: मी एका महिला असून तुम्हीच माझ्या घरात येऊन मलाच मारण्याची धमकी देत आहात -दीपाली सय्यद
तुम्ही ज्यांच्याकडं जाऊन तक्रार करताय त्यानांच समाजातील थोर पुरुषांबद्दल कस बोलायचं , बोलायच ते कळत नाही आणि तुम्ही माझी तक्रार त्यांच्याकडे असाप्रति प्रश्न त्यांनी विचारला आहे. एवढंच नव्हे माझ्या जीवाला धोका आहे
मुंबई – मराठी अभिनेत्री व शिवसनेच्या प्रवक्त्या दीपाली सय्यद (Deepali Syyed )व भाजप महिला आघाडमधील वाद चांगलाच पेटला आहे. दीपालीस सय्यद यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह ट्विटवरून (twitter) आहे वाद उभा राहिला आहे. यावर बोलताना दीपाली म्हणाल्या की मी महिलांच्या बद्दल कोणत्याही प्रकारची टिप्पणी केलेली नाही. याउलट मी एका महिला असून तुम्हीच माझ्या घरात येऊन मलाच मारण्याची धमकी देत आहात. तुम्ही ज्यांच्याकडं जाऊन तक्रार करताय त्यानांच समाजातील थोर पुरुषांबद्दल कस बोलायचं , बोलायच ते कळत नाही आणि तुम्ही माझी तक्रार त्यांच्याकडे असाप्रति प्रश्न
त्यांनी विचारला आहे. एवढंच नव्हे माझ्या जीवाला धोका आहे अशी तक्रार मी देणारा आहे. आणि तुमच्या या धमक्याना मी घाबरत नाही. मी वाट बघतेय तुम्ही कधी येताय ते., तुम्हा जसे पंतप्रधान महत्त्वाचे तसेच आम्हाला मुखमंत्री महत्त्वाचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.