सोनिया गांधी व राहुल गांधी यांना अचानक भोपळ विमानतळावर उतवण्यात आलं? नेमकं कारण काय?

सोनिया गांधी व राहुल गांधी यांना अचानक भोपळ विमानतळावर उतवण्यात आलं? नेमकं कारण काय?

| Updated on: Jul 19, 2023 | 9:00 AM

देशभरातील अनेक प्रमुख विरोधी नेत्यांसह काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळी उपस्थित होते. याबैठकीनंतर सोनिया गांधी व राहुल गांधी हे दिल्लीला रवाना झाले.

भोपळ, 19 जुलै 2023 | कर्नाटकमधील बंगळुरू येथे देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी देशभरातील अनेक प्रमुख विरोधी नेत्यांसह काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळी उपस्थित होते. याबैठकीनंतर सोनिया गांधी व राहुल गांधी हे दिल्लीला रवाना झाले. मात्र ऐनेवेळी त्यांचे विमान अचानक भोपळ विमानतळावर उतवण्यात आलं? त्यामुळे अचानक असं काय झालं ज्यामुळे आपत्कालीन लँडिंग करावी लागली असा सवाल अनेकांच्या मनात उभा झाला होता. मात्र सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विमानाचं आपत्कालीन लँडिग हे खराब हवामानामुळे करण्यात आल्याची माहिती भोपाळ पोलिसांनी दिली. तर यादरम्यान बंगळुरू पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीत भाजपसर सडकून टीका करण्यात आली. तर ही लढाई आता मोदी विरोधात इंडिया असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

Published on: Jul 19, 2023 08:50 AM