मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मोठी अपडेट, बघा व्हिडीओ

| Updated on: Mar 07, 2023 | 10:29 PM

VIDEO | पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी काय आहे अपडेट, बघा व्हिडीओ

पुणे : पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. वसंत मोरे यांच्या मुलाचं बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार आज समोर आला होता. खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली असून वसंत मोरे यांचा मुलगा रुपेशचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवत फसवणूक करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देणाऱ्याला मुंबईहून एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अल्फिया शेख या महिलेच्या नावाने व्हॉट्सअप मेसेज करण्यात आला आणि वसंत मोरे यांचे चिरंजीव रूपेश मोरे याला 30 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

Published on: Mar 07, 2023 10:29 PM
नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर उद्या राज ठाकरे यांना भेटणार, अजून कोणाच्या घेणार गाठीभेठी?
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेकडून तिसऱ्या आरोपीला अटक, काय आहे नाव?