राणा दाम्पत्य उद्या Nagpur मध्ये हनुमान चालिसा वाचणार, अटी शर्थीसह पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली
राणा दाम्पत्याला पोलिसांनी हनुमान चालिसा पठण करण्यास परवानगी दिली आहे. तर अटी शर्थीसह पोलीस आयुक्तांनी परवानगी दिल्याचे कळत आहे.
नागपूर : उद्या, शनिवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, त्याचे पती आमदार रवी राणा (MP Navneet Rana and MLA Ravi Rana) हे नागपूरच्या रामनगर येथील हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करणार आहेत. त्याचवेळी त्याच मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा देशातील महागाई दूर व्हावी यासाठी हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्यामुळं मंदिरात राणा दाम्पत्य विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असा सामना रंगण्याची शक्यता आहे. याचदरम्यान राणा दाम्पत्याला पोलिसांनी हनुमान चालिसा पठण करण्यास परवानगी दिली आहे. तर अटी शर्थीसह पोलीस आयुक्तांनी परवानगी दिल्याचे कळत आहे. मात्र रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे.
Published on: May 27, 2022 08:51 PM
Latest Videos