Supriya Sule : सरकार विमानातं फिरतंय, हॉटेलात बसतंय अन् अडीच हजाराची दाढी कटींग करतंय, खा. सुप्रिया सुळे यांनी घेतला खरपूस समाचार

Supriya Sule : सरकार विमानातं फिरतंय, हॉटेलात बसतंय अन् अडीच हजाराची दाढी कटींग करतंय, खा. सुप्रिया सुळे यांनी घेतला खरपूस समाचार

| Updated on: Jul 10, 2022 | 4:37 PM

Supriya Sule News : हे सरकार विमानातं फिरतंय, हॉटेलात बसतंय अन् अडीच हजाराची दाढी कटींग करतंय उपरोधिक टोला खा. सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकाला लगावला आहे.

पुणे : राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे ((MP Supriya Sule)यांनी राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारच्या कार्यपद्धतीचा खरपूस समाचार घेतला आहे. हे सरकार विमानातं फिरतंय, हॉटेलात बसतंय अन् अडीच हजाराची दाढी कटींग करतंय उपरोधिक टोला खा. सुळे यांनी शिंदे (Shinde Government) सरकारला लगावला आहे. बंडखोरीच्या काळात या सरकारचे उद्योग जनता विसरणार नाही. बंडखोर (Rebel MLA) सत्तेसाठी एकत्रित आले आहे. त्यांचा स्वार्थ जनतेपासून लपून राहिलेला नाही. पण आता तेच विठ्ठलाचा आशिर्वाद घेण्यासाठी आल्याचे म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनाच टार्गेट केले आहे. हे सरकार स्थिर नाही, पण सरकार अस्थिर नसल्याचा आव आणल्या जात असल्याचा आरोप सुळे यांनी केला.

शिवसेनेचा उत्तराधिकारी तर नेमला

राष्ट्रवादी आता ही मित्रपक्ष शिवसेनेसोबत आहे. भविष्यातही राष्ट्रवादी सेनेबरोबरच राहिल असे सांगायला ही त्या विसरल्या नाही. तसेच ज्या नेतृत्वाविरोधात शिंदे आणि बंडखोरांनी बंड केले आहे, त्याच उद्धव ठाकरे यांना खुद्द बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी नेमल्याचे आणि बंडखोरांनी त्यांना दुखावल्याचे त्या म्हणाल्या.