रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये घेतला मोठा निर्णय; सलग तिसऱ्यांदा रेपो रेटवर घेतला हा निर्णय

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये घेतला मोठा निर्णय; सलग तिसऱ्यांदा रेपो रेटवर घेतला हा निर्णय

| Updated on: Aug 10, 2023 | 11:32 AM

ज्यामुळे कमवणाऱ्यासह घरचालणारा गृहिणीवर्ग देखील मेटाकुटीला आहे. याचदरम्यान रेपो दरात वाढ झाल्याने अनेकांना ईएमआयच्या हप्त्याने शॉक दिला आहे. त्यातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पतधोरण जोहिर होण्याची शक्यता होती.

मुंबई, 10 ऑगस्ट 2023 । वाढती महागाईमुळे अनेकांच्या खिशाला सध्या चाट बसत आहे. तर यामुळे गृहिनींचे बजेर पुर्ण कोलमडले आहे. ज्यामुळे कमवणाऱ्यासह घरचालणारा गृहिणीवर्ग देखील मेटाकुटीला आहे. याचदरम्यान रेपो दरात वाढ झाल्याने अनेकांना ईएमआयच्या हप्त्याने शॉक दिला आहे. त्यातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पतधोरण जोहिर होण्याची शक्यता होती. तर याच्या आधी दोनदा रेपो दर स्थिर ठेवत आरबीआयने सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. त्याचप्रमाणे याही वर्षी दिलासा देत आरबीआय हॅटट्रीक करणार का याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले होतं. तर आज आरबीआयने या वर्षाचे पतधोरण निर्णय जाहिर करत सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आरबीआय रेपो रेट ‘जैसे थे’ ठेवल्याची घोषणा केली. ज्यामुळे रेपो रेट ‘जैसे थे’ ठेवण्याची हॅटट्रीक आरबीआयने साधली आहे. तर सर्वसामान्यांना दिलासा देखील दिला आहे. रेपो दर ‘जैसे थे’ ठेवल्यामुळे रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम राहिला आहे.

Published on: Aug 10, 2023 11:31 AM