12th Result 2022 | बारावीच्या विद्यार्थांना उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार
उमेदवारांनी निकालासंबंधित सर्व नवीन माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट पहावी.
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा म्हणजेच बारावीचा निकाल (Maharashtra HSC Results 2022) आता लवकरच हाती येणार आहे. बारावीचा निकाल हा 8 जून रोजी येणार असून दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. याबाबत गेल्या आठवड्यात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad)यांनी माहिती दिली होती. त्यानुसार आता बारावीचा निकाल हा ठरलेल्या तारखेलाच येणार आहे. तर निकालाची धाकधूक आता पासूनच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. दरम्यान हा निकाल निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboard.in वर पहायला मिळेल. निकाल पाहण्यासाठी स्वतःचा परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर, आईचं नाव माहिती असणं आवश्यक आहे.
Published on: Jun 07, 2022 07:20 PM
Latest Videos