निकाल लागला आणि भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा
ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चिडले आणि त्यांनी मारहाण केली असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसात धाव घेतली. हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
नागपूर | 6 नोव्हेंबर 2023 : जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. भाजपचे अनेक कार्यकर्ते जलालखेडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करायला पोहोचले. नरखेड तालुक्यातली लोहारा आणि घोगरा ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालानंतर ही मारहाण झाली. ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाला म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याची तक्रार भाजप कार्यकर्त्यांनी केली. पोलीसांकडून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, काटोल विधानसभा मतदारसंघात ८५ टक्के ग्रामपंचायत राष्ट्रवादी काग्रेस ( शरद पवार) यांनी जिंकल्या. मात्र, भाजप जिंकल्याचा दावा करत आहेत. त्यांनी जिंकलेल्या गावांची नावं दाखवावी. फार कमी ग्रामपंताय भाजपने जिंकल्या असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.