दंगल पेटवणारे उच्चवर्णीय ब्राह्मण असतात, Sujat Ambedkar यांच्या वक्तव्याने चर्चा
मशिदीवरील भोंग्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच पेटलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी राज ठाकरेंचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना हनुमान चालिसा म्हणून दाखवण्याचे खुले आव्हान दिले होते.
मशिदीवरील भोंग्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच पेटलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी राज ठाकरेंचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना हनुमान चालिसा म्हणून दाखवण्याचे खुले आव्हान दिले होते. ही घटना ताजी असतानाच सुजात आंबेडकरांनी पुन्हा एकदा मनसेवर टीकास्त्र सोडलं आहे. अमित राज ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणण्यासाठी पर्सनल ईव्हीटेशन दिलं नव्हतं, असं ते म्हणाले. दंगल पेटवणारे हे उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राम्हण असतात आणि रस्त्यावर उतरणारी बहुजन मुलं असतात. राज ठाकरे यांना दंगल पेटवायची असेल, तर त्यांनी स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवावं आणि स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका, असा इशारा सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.