Dilip Walse Patil: केंद्रातील सत्ताधारी धार्मिक तेढ निर्माण करतायत : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
याच पद्धतीने देश जर चालत राहिला तर अन्य देशात सुरू असलेल्या परिस्थितीसारखे चित्र आपल्या देशातही उभे राहील. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने राजीव गांधी यांचा एकता आणि समानतेच्या विचारांचा अंगीकार करावा.
पुणे – आज दुदैवाने सत्तेत बसलेले लोक वेगवेगळे आणि भावनात्मक प्रश्न निर्माण करून समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केला आहे. केंद्र सरकारवर त्यांनी टीका केली आहे. स्व. राजीव गांधींच्या स्मृती दिनानिमित्त आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार(Central Government ) आणि त्यांची कार्यपद्धती यावर त्यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की याच पद्धतीने देश जर चालत राहिला तर अन्य देशात सुरू असलेल्या परिस्थितीसारखे चित्र आपल्या देशातही उभे राहील. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा एकता आणि समानतेच्या विचारांचा अंगीकार करावा. सर्व घटकांना पुढे घेऊन जाण्याचे काम करण्याचे आवाहन यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.