मुंबईत रेल्वे अपघात टळला; लोकल रुळावरून घसरली, लोकल सेवा विस्कळीत

मुंबईत रेल्वे अपघात टळला; लोकल रुळावरून घसरली, लोकल सेवा विस्कळीत

| Updated on: Jun 18, 2023 | 12:05 PM

आज रविवार सकाळी अंबरनाथ येथे लोकल रुळावरून घसरली. तर कल्याण ते बदलापूर विभागात ब्लॉक घेण्यात आल्याने अपघात टळला. लोकलचा एक डबा रुळावरून घसरला तर लोकल रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रेल्वेमध्ये विविध ठिकाणी अपघात समोर येत आहेत. याचदरम्यान आज रविवार सकाळी अंबरनाथ येथे लोकल रुळावरून घसरली. तर कल्याण ते बदलापूर विभागात ब्लॉक घेण्यात आल्याने अपघात टळला. लोकलचा एक डबा रुळावरून घसरला तर लोकल रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. याचदरम्यान आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ठाण्यातील अंबरनाथ येथे धावत्या लोकलच्या एका डब्याचे एक चाक साइडिंगमध्ये रुळावरून घसरलं. मोटरमनने तातडीने लोकल थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रेल्वेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे कल्याण ते कर्जत दरम्यानच्या लोकल सेवेचे वेळापत्रक बिघडले आहे. तसेच एलटीटी – विशाखापट्टणमला अंबरनाथ येथे थांबून ठेवले आहे. तसेच एक डाऊन बदलापूर आणि अंबरनाथ लोकलला उल्हासनगर येथे थांबविले आहे. तर वीकेंडला फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यानंतर आता अपघातग्रस्त लोकलच्या दुरुस्तीचं काम रेल्वेकडून हाती घेण्यात आलं असून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे.

Published on: Jun 18, 2023 12:05 PM