Bhaskar Jadhav News | विकास कामांनाच शिंदे सरकारची कात्री, शिंदेंच्या खाद्यावरुन भाजप अजेंडा राबवित असल्याचा शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचा घणाघात
Bhaskar Jadhav News | शिंदे फडणवीस सरकारने लोकहितांच्या कामांना स्थगिती दिल्याचा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.
Bhaskar Jadhav News | राज्यातील यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aaghadi Government) 1 एप्रिलपासून राज्यात लोकहिताचे निर्णय घेतले होते. या कामांना नव्याने सत्तारुढ झालेल्या शिंदे फडणवीस (Shinde Fadnavis Government) सरकारने स्थगिती दिल्याचा आरोप शिवसेनेचे कोकणातील आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी केला. ग्रामीण भागातील विकासाची कामे, यात्रा, तिर्थक्षेत्र विकास, थोर व्यक्तींचे स्मारकं उभारण्याचे काम, विकास निधी थांबवण्याचा निर्णय नवीन सरकारने घेतला आहे. भारतीय जनता पार्टीने त्यांचा छुपा अजेंडा (hidden agenda) यानिमित्ताने पुढे रेटत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. बुलेट ट्रेनचे काम लागलीच हाती घेण्यात आले. आरेमध्येच कारशेड उभारण्याचे कुभाड रचण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. जलयुक्तशिवार योजना हे भष्ट्राचाराचे कुरण झाली होती. त्यातून राज्याला काहीच फायदा झालं नसल्याचे निष्पन्न झालं. तरीही ती सुरु करण्यात आली. एकनाथ शिंदे यांना पुढे करुन भाजप त्यांचा अजेंडा रेटून हे सरकार भाजपचंच असल्याचा दवंडी पिटवत असल्याचा आरोप त्यांनी केला.