अजित पवार यांच्या प्रवेशाने शिंदे गटात खदखद वाढली? शिंदे यांच्याकडे केली कोणती मागणी?
शिंदे गटाकडून आता थेट त्यांची ही अडचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच मांडण्यात आली आहे. यावेळी शिंदे गटाकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मंत्रीमंडळातील महत्वाची खाती देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादितील आमदारांनी शिंदे-भापज सरकारमध्ये प्रवेश करून 48 तास ही ओलंडले नाहीत तोच शिंदे गटातील खदखद आता समोर येत आहे. शिंदे गटाकडून आता थेट त्यांची ही अडचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच मांडण्यात आली आहे. यावेळी शिंदे गटाकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मंत्रीमंडळातील महत्वाची खाती देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्यावर मागिल सरकारमध्ये निधी देत नसल्याची टीका करण्यात आली होती. तर शिंदे गटाकडून हा मुद्दा रेटत शिवसेना सोडण्यात आली होती. पण आता अजित पवारच सत्तेत आल्याने शिंदे गटाची गोची झाली आहे. त्यामुळे अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला अर्थ, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.
Published on: Jul 04, 2023 01:55 PM
Latest Videos