पदवीधर निवडणूक लागण्याआधीच भाजप आणि शिंदे गटात धुसफुस

पदवीधर निवडणूक लागण्याआधीच भाजप आणि शिंदे गटात धुसफुस

| Updated on: Jan 11, 2023 | 11:25 AM

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीवरुन शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षात धुसफुस सुरु झाली आहे.

मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपसह मीत्र पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. याच्याआधीच प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट करत ही निवडणूक शिंदे-फडणवीस सरकार विरोधात लढणार असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर आता जागा वाटपावरून भाजप आणि शिंदे गटात धुसफुस सुरू असल्याचे कळत आहे.

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीवरुन शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षात धुसफुस सुरु झाली आहे. यावरून मंगळवारी कॅबिनेटच्या बैठकीत देखील चर्चा झाली. भाजपने परस्पर उमेदवार जाहीर केल्याबद्दल शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

या निवडणुकीवरुन भाजपने परस्पर देवेन भारती यांच्या नियुक्ती केली. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी ३० जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे

Published on: Jan 11, 2023 11:25 AM