VIDEO : ‘मातोश्री’च्या जवळच असणऱ्या शाखेवरच चालला BMC चा बुलडोझर
वांद्रे भागातील शाखेवर करत BMC ने त्यावर थेट बुलडोझर चालवला. तसेच ती तोडून टाकली आहे. विशेष म्हणजे ही शाखा मातोश्री निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावर आहे. तर ही शाखा तोडताना ती अनिधिकृत असल्याचा दावा BMC ने केला आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एका शाखेवर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. वांद्रे भागातील शाखेवर करत BMC ने त्यावर थेट बुलडोझर चालवला. तसेच ती तोडून टाकली आहे. विशेष म्हणजे ही शाखा मातोश्री निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावर आहे. तर ही शाखा तोडताना ती अनिधिकृत असल्याचा दावा BMC ने केला आहे. तर तब्बल 40 वर्षे जुनी असलेल्या या शाखेवर BMC कडून कारवाई करण्यात आल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या शाखेची स्थापना करण्यात आली होती. जी शिवसेना ठाकरे गटाची ऑटो चालक वेल्फेअरचे कार्यालय म्हणून चालवली जात होती.
Published on: Jun 22, 2023 01:43 PM
Latest Videos