कोल्हापरूच्या दोन्ही बंडखोर खासदारांना फटका बसणार? ठाकरे गटाची नवी रणनिती काय?

कोल्हापरूच्या दोन्ही बंडखोर खासदारांना फटका बसणार? ठाकरे गटाची नवी रणनिती काय?

| Updated on: Jul 11, 2023 | 12:21 PM

तर ठाकरे गटाकडून देखील लोकसभेच्या निवडणुकिवरून बैठका घेतल्या जात आहेत. यावेळी ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांनी कोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही जागांवर दावा केला होता.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीला अजून अवधी आहे. मात्र त्याच्याआधीच आता निवडणुकिवरून सत्तासमिकरणांना वेग आला आहे. तर ठाकरे गटाकडून देखील लोकसभेच्या निवडणुकिवरून बैठका घेतल्या जात आहेत. यावेळी ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांनी कोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही जागांवर दावा केला होता. त्यावेळी महाविकास आघाडी भक्कम होती. मात्र आता आघाडीत पुर्णत बिघाडी झाली असून मुख्य मोहरा अजित पवारच आता सत्ताधाऱ्यांच्यात गेले आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून रणनिती आखली जात आहे. शिवसेना फुटीनंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर हे दोन्ही मतदार संघावर शिवसेनेनं आपला दावा सांगितला आहे. त्याचपार्श्वभूमिवर मोर्चेबांधणी सुरू असून मुंबईत आता बैठक घेतली जात आहे.

Published on: Jul 11, 2023 12:21 PM