Special Report | तृतीयपंथीयांच्या जिव्हारी लागला नितेश राणे यांचा तो शब्द; थेट रस्त्यावर उतरत केलं आंदोलन

Special Report | तृतीयपंथीयांच्या जिव्हारी लागला नितेश राणे यांचा तो शब्द; थेट रस्त्यावर उतरत केलं आंदोलन

| Updated on: Jul 13, 2023 | 8:55 AM

फडणवीस यांचा उल्लेख नागपूरला कलंक असा केला. त्यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी पलटावर करताना, हिजड्यांचे सरदार असा उल्लेख ठाकरे यांचा केला. त्यावरून सध्या जोरदार राजकारण रंगलं आहे.

पुणे : माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपुरमध्ये जोरदार हल्ला चढवला होता. त्यांनी फडणवीस यांचा उल्लेख नागपूरला कलंक असा केला. त्यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी पलटावर करताना, हिजड्यांचे सरदार असा उल्लेख ठाकरे यांचा केला. त्यावरून सध्या जोरदार राजकारण रंगलं आहे. तर पुण्यात या वक्तव्यावरून तृतीयपंथींनी आंदोलन केलं. ज्यातनंतर पोलीस आणी तृतीयपंथीयांमध्ये जोरदार झटापट झाली. यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनीच जे काँग्रेससमोर झुकतील ते हिजडे असं म्हटलं होतं. त्याप्रमाणे २०१९ पासून ठाकरे हे काँग्रेससमोर झुकत आहेत. त्यावरून आपण त्यांनी हिजड्यांचे सरदार असं म्हटल्याचं राणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र यानंतरही वंचितसह ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 13, 2023 08:55 AM