सरकार टिकविण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड; सर्वच कायदेशीर मार्गचे अवलंबन करणार!

| Updated on: Jun 29, 2022 | 3:25 PM

सरकार अल्पमतात आल्याचा दावा शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्या ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे पत्र राज्यपालानी पाठवले. या पार्श्वभूमीवर सरकार वाचविण्यासाठी धडपड सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर राष्ट्रवादीची बैठक नुकतीच पार पडली. यावर बहुमत चाचणी या विषयावर चर्चा झाल्याची […]

सरकार अल्पमतात आल्याचा दावा शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्या ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे पत्र राज्यपालानी पाठवले. या पार्श्वभूमीवर सरकार वाचविण्यासाठी धडपड सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर राष्ट्रवादीची बैठक नुकतीच पार पडली. यावर बहुमत चाचणी या विषयावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सरकार वाचविण्यासाठी सर्वच कारदेशीर मार्ग वापरण्याचेही ठरले असल्याचे कळते. दुसरीकडे  एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातले आमदार आज गोवा येथे मुक्कामी असणार आहेत आणि उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. याशिवाय शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले असून त्यांच्या याचिकेवर आज संध्याकाळी 5 वाजता सुनावणी होणार आहे.

Published on: Jun 29, 2022 03:25 PM