Manipur violence : धगधगत्या मणिपूरवर नजर ठेवण्याची जबाबदारी मराठी अधिकाऱ्यावर

Manipur violence : धगधगत्या मणिपूरवर नजर ठेवण्याची जबाबदारी मराठी अधिकाऱ्यावर

| Updated on: Aug 08, 2023 | 10:05 AM

त्यानंतर आजही तेथे जातीय हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झालेत. तर अनेकांना बेघर व्हावं लागलं आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासह माजी पोलिस अधिकारी यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023 | मणिपूर हे ३ मे पासून धुमसत आहे. येथे मेतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यावरून वादंग झाला. त्यानंतर आजही तेथे जातीय हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झालेत. तर अनेकांना बेघर व्हावं लागलं आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासह माजी पोलिस अधिकारी यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी, ही समिती मानवतावादी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतील असे म्हटलं आहे. या समितीत जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश गीता मित्तल, मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती शालिनी जोशी आणि न्यायमूर्ती आशा मेनन यांचा समावेश असेल. तसेच तेथील तपासावर माजी पोलिस अधिकारी हे लक्ष ठेवतील. यात महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांचा समावेश आहे.

Published on: Aug 08, 2023 10:05 AM