Maharashtra Political Crisis : शिंदे गटाची झोप उडणारी बाजमी? ठाकरे गटाची सुनावणी 14 जुलै रोजी
त्यानंतर त्यांच्यासह 15 आमदारांच्या विरोधात कारवाईची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. ज्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. पुन्हा हेच प्रकरण सर्वोच्च न्यायालयातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणीसाठी देण्यात आलं आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वर्षांपुर्वी शिवसेनेला राम राम केला होता. तर त्यांनी आपल्या सोबत 40 एक आमदार घेत वेगळी चूल मांडली होती. त्यानंतर त्यांच्यासह 15 आमदारांच्या विरोधात कारवाईची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. ज्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. पुन्हा हेच प्रकरण सर्वोच्च न्यायालयातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणीसाठी देण्यात आलं आहे. पण त्यावर कारवाई होत नसल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुनील प्रभू यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यांनी तसेच यावर तातडीने सुनावणी घ्यावी अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे. यामुळे आता शिंदे गटात सध्या खळबळ उडाली असून 16 जणांवर टागती तलवार लटकत आहे. आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 14 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. Maharashtra Political Crisis