बीएमसीतील मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयावरून वाद चिघळला; ठाकरे गटाचा विरोध तिव्र होण्याची शक्यता?
तर महापालिकेला घेरण्याचा प्रयत्न केला होता. आदित्य ठाकरे यांनी, पालकमंत्र्यांना महापालिकेत कार्यालय कशासाठी? त्यांचा महापालिकेशी संबंध काय? असा सवाल करत तात्काळ आपलं कार्यालय खाली करावं असा इशारा दिला होता.
मुंबई | 25 जुलै 2023 : मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मुंबई महापालिकेत कार्यालय आहे. त्यावरून आता ठाकरे गटाचा विरोध याच्याआधीच दिसून आला होता. तर ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यावरून आक्षेप घेताना भाजपवर सडकून टीका केली होती. तर महापालिकेला घेरण्याचा प्रयत्न केला होता. आदित्य ठाकरे यांनी, पालकमंत्र्यांना महापालिकेत कार्यालय कशासाठी? त्यांचा महापालिकेशी संबंध काय? असा सवाल करत तात्काळ आपलं कार्यालय खाली करावं असा इशारा दिला होता. तसेच तासात महापालिकेतील कार्यालय रिकामं करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हा वाद वाढण्याची शक्यता आहे. कारण आता लोढा यांचे हे कार्यालय भाजपच्या माजी नगरसेवकांना देण्यात येणार आहे. येथून हे माजी नगर सेवक लोकांची कामं कऱणार असल्याचे कळत आहे. त्यामुळे आता भाजपचे माजी नगर सेवक हे महापालिकेत दिसणार आहेत. त्यामुळे यावरून आता ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आला आहे.