Bhandara : ट्रॅक्टर पोळा, भंडाऱ्यात एकाच वेळी 60 ट्रॅक्टरचा सहभाग
भंडारा जिल्ह्यातील डोंगरगावात या पोळा सणात एकाच वेळी 60 ट्रॅक्टर हे सहभागी झाले होते. धान उत्पादक शेतकरी देखील ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करीत आहे.त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी बैलाप्रमाणेच ट्रॅक्टरची सजावट करीत गावातून ट्रॅक्टरची मिरवणूक तर काढण्यात आली पण ट्र्रॅक्टर या यंत्राच्या ऋणाईत हा उत्सव असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.
भंडारा : यंदा (Bail Pola) पोळ्याचा उत्साह काही वेगळाच आहे. दोन वर्षापासून या बैलपोळ्यावर कोरोनाचे सावट होते त्यामुळे उत्साहात बैलपोळा तर पार पडलाच पण ट्रॅक्टर पोळाही होत आहे. काळाच्या ओघात शेती व्यावसायात यांत्रिकिकरणाचा वापर वाढत आहे. बौलजोडीची जागा ट्रॅक्टर घेत आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे बैलजोडीला घेऊन पोळा हा सण साजरा केला जातो अगदी त्याप्रमाणेच ट्रॅक्टरची सजावट करुन (Tractor Pola) ट्रॅक्टरपोळा करण्याची परंपरा रुजत आहे. (Bhandara Farmer) भंडारा जिल्ह्यातील डोंगरगावात या पोळा सणात एकाच वेळी 60 ट्रॅक्टर हे सहभागी झाले होते. धान उत्पादक शेतकरी देखील ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करीत आहे.त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी बैलाप्रमाणेच ट्रॅक्टरची सजावट करीत गावातून ट्रॅक्टरची मिरवणूक तर काढण्यात आली पण ट्र्रॅक्टर या यंत्राच्या ऋणाईत हा उत्सव असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.