शरद पवार यांच्या भूमिकेमुळे मविआचं ठरलं; थेट पवार यांनाच डच्चू? आता काँग्रेस-शिवसेनाच विरोधात लढणार

शरद पवार यांच्या भूमिकेमुळे मविआचं ठरलं; थेट पवार यांनाच डच्चू? आता काँग्रेस-शिवसेनाच विरोधात लढणार

| Updated on: Aug 15, 2023 | 2:43 PM

तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून देखील शरद पवार आणि अजित पवार गटात आधीमधी भेटी होत आहेत. तर सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची गुप्त बैठक घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उत आला आहे.

मुंबई, 15 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकारण कुठं चाललं आहे याची हेच अनाकलनीय आहे. येथे कोण कोणाच्या विरोधात आणि कोण कोणाच्या बरोबर आहे हेच कळत नसल्याने राज्याचं राजकारणात संभ्रम निर्माण झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून देखील शरद पवार आणि अजित पवार गटात आधीमधी भेटी होत आहेत. तर सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची गुप्त बैठक घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उत आला आहे. तर या घडामोडींचा विपरीत परिणाम हा राज्यातील महाविकास आघाडीवर झाला असून काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. तर महाविकास आघाडीमधून शरद पवार यांना बाजूला सारण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. तर आगामी लोकसभा आणि विधान सभेच्या निवडणूकांसह स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणूका देखील शरद पवार यांच्या व्यतिरिक्त लढण्याची तयारी काँग्रेस आणि ठाकरे गटाने केली असल्याची माहिती आहे. तर याबाबत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर काँग्रेस-सेनेकडून प्लॅन बी आखला जात असून आघाडीत बिघाडी झालीच तर त्याप्रमाणे निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली जात आहे.

Published on: Aug 15, 2023 02:43 PM