VIDEO | धक्कादायक! आमदार बांगर यांचा एसटी कंडक्टरला शिवीगाल व धमकी; व्हिडिओ व्हायरल
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचा पुन्हा एकदा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी थेट एसटी कंडक्टरलाच धमकी दिली आहे.
हिंगोली : 19 ऑगस्ट 2023 | शिवसेना शिंदे गटाने नेते आणि आमदार संतोष बांगर हे काही ना काही कारणाने चांगलेच चर्चेत असतात. याच्याआधी त्यांचे अधिकारी, शिक्षकांना धमकी आणि अरेरावी करणारे फोन व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. आता देखील त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. यावेळी बांगर यांनी एसटी कंडक्टरलाच धमकी दिल्याने एकच खळबळ उडालेली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बोरजा-डिग्रससह इतर गावातून विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी मानव विकासची बस धावते. मात्र ती वेळेत येत नाही व वाहक अरे-रावीची भाषा करत असतो. अशी तक्रार काही विद्यार्थ्यांनी कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या कार्यालयात जाऊन केली. यावेळी बांगर यांनी विद्यार्थ्यांचे गाऱ्हाणे ऐकून संतापले व त्यांनी आगारातील संबंधिताला ऑफिसमध्ये बोलावून दम दिला. दमच दिला नाहीतर जो कुणी संबधीत वाहक आहे त्याला समजून सांगा, त्याला दुसरीकडे टाका नाहीतर मी पायाखाली तुडवून मारिन म्हणत धमकी दिली. आमदार बांगर यांची जीभ घसरल्याचा हो व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.