The Family Man 2 Trailer | फॅमिली मॅन 2 ची प्रतीक्षा संपली, नव्या सीजनमध्ये काय असेल सरप्राइज फॅक्टर

| Updated on: May 19, 2021 | 1:44 PM

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची ओरिजिनल वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ने (The Family Man 2) प्रेक्षकांच्या मनात अशी काही छाप सोडली की, प्रेक्षक आता त्याच्या दुसर्‍या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांचा तोच उत्साह आणि प्रेम पाहून मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) ची मुख्य भूमिका असलेल्या ‘द फॅमिली मॅन’ चा दुसरा सीझन आणण्यात आला आहे. 4 जून रोजी ही सीरीज रिलीज होणार असून नुकताच धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.