अलर्ट, अलर्ट, अलर्ट! राज्यातील या 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट; राज्यातही 5 दिवस मुसळधार कोसळणार पाऊस
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात पाऊस होताना दिसत आहे. तर आता देखील पुढील ५ दिवस पाऊस दमदार होणार असल्याचा अंदाज हवमान विभागाने वर्तवला आहे.
चंद्रपूर, 19 जुलै 2023 | राज्यातील बळीराजासाठी दिलासा दायक बातमी आहे. गेल्या एक महिन्यापाशून दडी मारलेल्या पावसाने आता कुठे हजेरी लावायला सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात पाऊस होताना दिसत आहे. तर आता देखील पुढील ५ दिवस पाऊस दमदार होणार असल्याचा अंदाज हवमान विभागाने वर्तवला आहे. यावेळी हवामान विभागाकडून पुढील ५ दिवसात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज सांगण्यात आला आहे. तर या अंदाजामुळे चंद्रपूरमध्ये अतिवृष्टीच्या कारणाने शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. तर हवामान विभागाकडून पुणे, रायगड, पालघर आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून कोल्हापूर सह आता सातारा आणि पुणेकरांच्या चिंतेचं कारण मिटलं आहे. पावसाळा सुरू होऊन महिना ओलांडला तरी पाऊस झाला नसल्याने पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील धरणातील पाणी पातळी कमी झाली होती. ज्यामुळे या जिल्ह्यावर पाणीबाणी येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता या जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आल्याने येथे अजितवृष्टी होईल अशी शक्यता आहे. जर पाऊस झालाच तर येथील धरणातील पाणीपातळी वाढण्यास मदत होईल.