Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत समुद्र किनारी फिरायला जाण्याआधी ही बातमी वाचाच! पुढील पाच दिवस समुद्रात काय होणार?

मुंबईत समुद्र किनारी फिरायला जाण्याआधी ही बातमी वाचाच! पुढील पाच दिवस समुद्रात काय होणार?

| Updated on: Aug 02, 2023 | 9:52 AM

यासदर्भात हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला असून पुढील 4 ते 5 दिवसात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मुंबईकरांना हवामान विभागाकडून आता अलर्ट देण्यात आला असून काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

पुणे, 02 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पवासाने पुन्हा एकदा हजेरी लावण्याचे संकेत दिले आहे. यासदर्भात हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला असून पुढील 4 ते 5 दिवसात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मुंबईकरांना हवामान विभागाकडून आता अलर्ट देण्यात आला असून काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तर मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असे आवाहन करताना येथे पुढील सलग पाच दिवस समुद्र खवलेला असेल. त्यामुळे येथे सलग पाच दिवस भरती येईल. तर येथे पावणेपाच मीटरहून अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना सावधगिरी बाळगावी, काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. Marine Drive Sea Waves

Published on: Aug 02, 2023 09:52 AM