विहिर पाण्याने भरली, पण आमरण उपोषणासाठी ‘त्याची’ मागणीच वेगळी
मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा मोरे याने दिला आहे.
बुलढाणा : आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा बुलढाणा येथील एका शेतकऱ्याने दिला आहे. देविदास मोरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने विहिरीत लोखंडी खॉट टाकली आहे. त्यावर बसून त्याने आमरण उपोषण सुरु केले आहे.
गावठाणात लागून असलेली घरे नियमाकुल करण्याची त्याची मागणी आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा मोरे याने दिला आहे. त्यामुळे आता स्थानिक प्रश्न याबाबत काय कारवाई करते याकडे लक्ष लागून राहिले आहे.
Published on: Jan 24, 2023 09:06 AM
Latest Videos