Raj Thackeray :राज ठाकरे यांच्या सभेचे फुटेज व सीसीटीव्ही तपासण्याचे काम पूर्ण , अहवाल तयार करण्याचे काम सुरु
राज ठाकरे यांच्या सभेचा अहवाल तयार करण्याचे कामपोलिसांकडून सुरु आहे. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केले आहे का? याची तपासणी केली जात आहे. याबरोबरच सभेसाठी केवळ 15 हजार लोकांचा परवानगी देण्यात आली होती.
औरंगाबाद- राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्या औरंगाबाद येथे झालेल्या सभेत प्रशासनाने घालून दिलेल्या अटीशर्थीचे पालन झाले नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. राज ठाकरे यांच्या सभेचे फुटेज व सीसीटीव्ही तपासण्यात आली आहे. डीसीपी अपर्णा गीते (DCP Aparna Gite) यांच्या पथकाकडून ही तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. सायबर सेलकडून (Cyber Cell )पाच तास या फुटेजची तपासणी करण्यात आली आहे. सात – आठ कर्मचाऱ्यांनी या फुटेजची तपासणी केली. राज ठाकरे यांच्या सभेचा अहवाल तयार करण्याचे कामपोलिसांकडून सुरु आहे. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केले आहे का? याची तपासणी केली जात आहे. याबरोबरच सभेसाठी केवळ 15 हजार लोकांचा परवानगी देण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र किती लोक जमा झाले होते याची तपासणीही पोलिसांकडून केली जात आहे.
Published on: May 02, 2022 05:18 PM
Latest Videos