‘…तर मी शिवसेनेतून बाहेर पडेल…’, काय म्हणाले विजय शिवतारे
बारामतीतील लढाई विजय शिवतारे विरोधात सुप्रिया सुळे अशीच होणार असल्याचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी 25 वर्षांचे घनिष्ठ संबंध आहेत, ते कायम राहतील असेही म्हटले आहे. त्यांची अडचण होऊ देणार नसल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
पुणे : बारामतीच्या लोकसभा निवडणूकीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार असताना नवा ट्विस्ट आला आहे. अजित पवार यांचे कट्टर विरोधक, शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी वेळ पडली तर बारामतीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवू ,परंतू माघार घेणार नाही अशी घोषणा केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीत एकत्र आहेत. त्यातच महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार असल्याने आता विजय शिवतारे शिवसेनेतून बाहेर पडणार का ? असा थेट सवाल केला असता शिवतारे म्हणाले, एकनाथ शिंदे यांचं माझं नातं घनिष्ठ आहे. त्यांची अडचण झाली आहे. मला तर निवडणूक लढवायची असून दोन्ही पवार लोकांना नको असल्याने आपण लोकसभेत मोठा विजय मिळविणारच असे शिवतारे यांनी म्हटले आहे. माझ्यावर कारवाई होणार अशा बातम्या काल आल्या होत्या, बघुया काय होते ते, कपोलकल्पित गोष्टींवर बोलणे योग्य नाही. आपण निवडणूक लढविणार आणि जिंकणारच असे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी म्हटले आहे.