‘तर मग हाच न्याय मुख्यमंत्री शिंदे यांना….’, जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटाला डीवचलं
शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार जितेंद्र अवध यांच्यावर आरोप केला होता. त्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो दाखवत त्यांनी शिंदे गटाला डीवचलं.
ठाणे | 25 ऑक्टोंबर 2023 : आमच्यावर आरोप करण्यापेक्षा जरा हे आरोपी मुख्यमंत्री सोबत कोण आहे हे सांगा असे आव्हान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांना दिलंय. ड्रग्स प्रकरणांमध्ये नाशिक पोलीसांनी मुंब्रायातून सलमान फाळके याला अटक केली आहे. आमदार मनीषा कायंदे यांनी पत्रकार परिषदेत आरोपी सलमान फालके आणि जितेंद्र आव्हाड यांचे फोटो उघड केले. माझ्यासोबत येता जाता कुणीही फोटो काढतो तर मी काय सर्वांना त्यांचा कॅरेक्टर सर्टिफिकेट विचारत राहु का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले दोन प्रसिद्ध गुंड कोण आहेत याची माहिती घ्या. माझा आरोप मुख्यमंत्री यांच्यावर नाही. मी कोणाचे नाव घेत नाही की हा गुंडा कोण आहे. परंतु मनीषा कायंदे यांनी ज्या पद्धतीने सुप्रियाताई आणि माझ्यावर आरोप केला. त्यावर आम्हालापण बोलावं लागेल असे ते म्हणाले.