निवडणुकी आधीच निवडणूक कोण लढविणार यावरून भिडाभिडी… आता कुठे रंगला सामना ?
महाविकास आघाडी आणि शिवसेना भाजप युतीमध्ये मतदारसंघ तसेच उमेदवारीवरून तू तू मै मै सुरु आहे. भाजपने शिंदे गटाच्या मतदारसंघात संयोजक नेमल्यामुळे नाराजी पसरली आहे.
धाराशिव : आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी गाजत आहे. महाविकास आघाडी आणि शिवसेना भाजप युतीमध्ये मतदारसंघ तसेच उमेदवारीवरून तू तू मै मै सुरु आहे. भाजपने शिंदे गटाच्या मतदारसंघात संयोजक नेमल्यामुळे नाराजी पसरली आहे. त्यातच भाजप आपल्या मतदारसंघावर दावा सांगत असल्यामुळे आतापासूनच कलगीतुरा सुरु झाला आहे. 2024 मध्ये आपल्या हक्काचा धाराशिव मध्ये भाजपचा खासदार व्हावा. आपल्या हक्काचे सरकार यावे यासाठी भाजपचा खासदार येथून यावा असे सांगत धाराशिव लोकसभा मतदार संघावर भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दावा सांगितला. त्याला शिवसेनेचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जोरदार उत्तर दिलंय. आम्हाला कोणी गृहीत धरून सहज घेतले तर ते आम्ही मान्य करणार नाही. 2024 ची धाराशिव लोकसभा जागा शिवसेनाच लढवणार. आम्ही जिकूंन आलेली 18 पैकी एकही जागा भाजपला सोडणार नाही. आमचा गट वेगळा आहे, आमचे अस्तित्व वेगळे आहे. आम्ही शिवसेना आहोत, पारंपरिक जागा आमच्याकडे आहे अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावले आहे.