शेतकऱ्यांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका ही आमच्या सरकारची : दीपक केसरकर
राज्यातील मंत्रीमंडळात राज्यअर्थमंत्री पद हे नसल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी केसरकर यांना संधी दिली आहे.
मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत तर विधानपरिषदेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर मांडणार आहेत. राज्यातील मंत्रीमंडळात राज्यअर्थमंत्री पद हे नसल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी केसरकर यांना संधी दिली आहे. यावरून त्यांनी शिंदे-फडणवीस यांचे आभार मानले आहे. राज्यमंत्री म्हणून पाच वर्ष त्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. शेतकरी हा नेहमीच केंद्रबिंदू राहिलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका ही आमच्या सरकारची असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
Latest Videos