महत्वाची बातमी; पिंपरी-चिंचवडकरांवर येऊ शकते पाणीबाणी, काय कारण?

महत्वाची बातमी; पिंपरी-चिंचवडकरांवर येऊ शकते पाणीबाणी, काय कारण?

| Updated on: Jun 18, 2023 | 12:51 PM

पाऊस नसल्यामुळे शेतीची कामं थांबली आहेत. तर आता अनेक धरणांतील पाण्याच्या पातळीणं तळ गाठायला सुरूवात केली आहे. अनेक धरणांमध्ये पाणी साठाच अल्प झाल्याने उपशावर बंदी घातली आहे.

मावळ (पुणे) : जून महिना आता अर्ध्या अधिक संपला आहे. मात्र अजूनही पावसाचा पत्ता नाही. पाऊस नसल्यामुळे शेतीची कामं थांबली आहेत. तर आता अनेक धरणांतील पाण्याच्या पातळीणं तळ गाठायला सुरूवात केली आहे. अनेक धरणांमध्ये पाणी साठाच अल्प झाल्याने उपशावर बंदी घातली आहे. अशातच आता मावळवासीयांची जीवनवाहिनी आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील पिंपरी-चिंचवड करांना पाणीपुरवठा करणारे पवना धरणातून चिंता आणणारी बातमी आहे. येथे पाणलोट क्षेत्रात केवळ 19.91टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ज्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. तर मावळच्या पवना धरणात मागील वर्षी हाच साठा 21 टक्के इतका होता. तर आता केवळ 19.91 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर शिल्लक पाणीसाठा हा जुलै महिन्या अखेरी पर्यंत पुरेल असा अंदाज पवना पाटबंधारे खात्याने काढला आहे. जर पाऊस लांबला तर हा पाणी साठा कमी पडू शकतो आणि नागरिकांना दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊ शकते असेही विभागानं सांगितलं आहे.

 

Published on: Jun 18, 2023 12:51 PM