Varun Sardesai : बंडखोरांजवळ एकच पर्याय..! आदित्य ठाकरेनंतर वरुण सरदेसाईने शिंदे गटाला सुनावले
सच्चा शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जनता ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच आहे. ज्यांना राजकीय स्वार्थ साधायचा होता त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. गट-तटाचे हे सरकार अल्पावधीसाठीच आहे. शिवाय या बंडखोर आमदारांना कोणत्या ना कोणत्या पक्षात विलीन झाल्याशिवाय पर्याय नसल्याचेही सरदेसाई म्हणाले आहेत. युवा सेनेच्या मेळाव्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
मुंबई : शिंदे गट आणि भाजपाची सत्ता स्थापन होऊन आता 2 महिन्यांचा कालावधी उलटलेला आहे. असे असले तरी (Shiv sena) शिवसेना अणि शिंदे गट यांच्यामध्ये शाब्दिक चकमक ही कायम पहावयास मिळालेली आहे. आतापर्यंत (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदारांचा उल्लेख हा गद्दार म्हणून करीत होते आता (Yuva Sena) युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनीही या आमदारांवर निशाणा साधलेला आहे. सच्चा शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जनता ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच आहे. ज्यांना राजकीय स्वार्थ साधायचा होता त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. गट-तटाचे हे सरकार अल्पावधीसाठीच आहे. शिवाय या बंडखोर आमदारांना कोणत्या ना कोणत्या पक्षात विलीन झाल्याशिवाय पर्याय नसल्याचेही सरदेसाई म्हणाले आहेत. युवा सेनेच्या मेळाव्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तर मुंबईत शिवसेनेशिवाय पर्याय नसल्याचेही सांगितले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री