नाराज? नाराज? नाराज? फोन आला, मात्र बच्चू कडू म्हणतात, 11 वाजता; मंत्रिमंडळात समावेश होणार?

नाराज? नाराज? नाराज? फोन आला, मात्र बच्चू कडू म्हणतात, 11 वाजता; मंत्रिमंडळात समावेश होणार?

| Updated on: Jul 13, 2023 | 9:36 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला आणि अनेकांना धक्का बसला. त्यावेळी त्यांच्यासह इतर ८ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गटासह भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सुर सुरू झाला.

अमरावती : गेल्या वर्षभरापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा रखडलेला होता. मात्र याच महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला आणि अनेकांना धक्का बसला. त्यावेळी त्यांच्यासह इतर ८ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गटासह भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सुर सुरू झाला. तो आताही कायम आहे. रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून तर आता मंत्रि मंडळात स्थान मिळत नसल्याने प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू हे नाराज आहेत. तर आता राज्य मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार होणार आहे. यासाठी सर्व जय्यत तयारी झाली आहे. मात्र याच्याआधी पुन्हा एकदा बच्चू कडू हे नाराज असल्याची जोरदार चर्चा समोर येत आहे. यावरून त्यांना विचारलं असता त्यांनी आपण आपली भूमिका पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी बोलून आपली भूमिका जाहीर करू असे म्हटलं आहे. तर यावरूनच ते नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

Published on: Jul 13, 2023 09:36 AM