Arvind Sawant | गट म्हणून त्यांना मान्यताच नाही, विलिनीकरणाशिवाय पर्याय नाहीच, खासदार अरविंद सावंत यांचा घटनेचा हवाला
Arvind Sawant | शिंदे गटाच्या अस्तित्वावर शिवेसना खासदार अरविंद सावंत यांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. त्यांनी राज्य घटनेच्या आधार घेत शिंदे गटाला विलिनीकरणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.
Arvind Sawant | शिंदे गटाच्या (Shinde Sena) अस्तित्वावर शिवसेनेकडून (Shivsena) सातत्याने प्रहार करण्यात येत आहे. हे सरकार दीर्घकाळ टिकणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन तृतीयांश आमदारांनी अथवा खासदारांनी पत्र दिले म्हणजे सर्व काही आलं असं नाही. हा जो काही प्रकार सुरु आहे, तो राज्य घटनेच्या विरोधात असल्याचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी सांगितले. गट म्हणून या बंडखोर आमदारांना घटनेनुसार (Constitution) मान्यताच नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना मान्यता त्याचवेळी मिळेल, ज्यावेळी हा गट दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन होईल. या गटाला आता विलिनीकरणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रश्न या आमदारांनाही विचारण्यात यावा. दोन तृतीयांश आमदार बाहेर पडले, तर पुढे काय असा प्रश्न त्यांना ही विचारण्यात यावा. गट म्हणून त्यांना कुठलेही मान्यता नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटासमोर एखाद्या पक्षात विलिनीकरणाशिवया दुसरा पर्याय नसल्याचे खासदार सावंत यांनी सांगितले.