ते आमचे सहकारी; पण… स्वप्न पहात आहेत, अनिल देशमुख यांची टीका कुणावर?
2024 ला मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसचाच होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यांना जी स्वप्ने पहायची असतील ती त्यांनी जरूर पहावीत. आमची काही ना नाही.
वाशिम : 25 सप्टेंबर 2023 | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोणाची ताकद किती आहे. आमच्याकडे किती आमदार असणार हे तुम्हाला 6 सहा तारखेला कळेल असा टोला शरद पवार गटाला लगावला होता. त्याला माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलंय. पवार साहेब यांनी आधीच सांगितले आहे की आता किती आमदार सोबत आहेत हे महत्वाचे नाही. पण, पुढे किती आमदार निवडून येतात ते महत्वाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाला आम्ही गांभीर्याने घेत नाहीत. पवार साहेब यांच्याकडे किती आमदार, खासदार आहेत हे त्यांना लवकरच कळेल या तटकरे यांच्या वक्तव्यावर बोलता ते म्हणाले. तटकरे आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी आताचे न बघता 2024 च्या निवडणुकीचे बघावे. त्या निवडणुकीमध्ये त्यांना कळून येईल. तटकरे यांनी आशावादी राहावे तसी स्वप्ने पहावीत.
Published on: Sep 25, 2023 11:29 PM
Latest Videos