एका हाकेचे अंतर गाठण्यासाठी त्यांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास
या दोन गावातील विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांचा रस्त्यात खोदकाम केलेल्या खड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे खर्डी रेल्वे स्थानकाशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे या ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांना पलीकडे जाण्यासाठी अवघड प्रवास करावा लागतोय.
शहापूर : भर पावसात रस्त्याच्या कामासाठी सगळीकडे खोदून ठेवले. पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालेय. ग्रामस्थांना एका हाकेचे अंतर गाठण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय. ही परिस्थिती ओढवली आहे शहापूर तालुक्यातील काष्टी व वैतागवाडी या दोन गावातील ग्रामस्थांवर. या दोन गावातील विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांचा रस्त्यात खोदकाम केलेल्या खड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे खर्डी रेल्वे स्थानकाशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे या ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांना पलीकडे जाण्यासाठी अवघड प्रवास करावा लागतोय. जेसीबीच्या सहाय्याने विद्यार्थी रस्ता पार करत आहेत. तर, चढाव चढून ग्रामस्थ पलिकडे पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करत आहेत. या ग्रामस्थांना पलीकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ताच नाही. त्यामुळे 500 ग्रामस्थांचा खर्डी रेल्वे स्थानकाशी संपर्क तुटला आहे.
Published on: Jun 29, 2023 08:20 PM
Latest Videos