चोरट्यांनी आधी हा पूल गॅस कटरने कापला नंतर तो ट्रकमध्ये भरून नेला ही मात्र… नंबरमुळे बेड्या पडल्या
बांगूर नगर पोलिसांनी ट्रकच्या नोंदणी क्रमांकावरून 4 जणांना अटक केली आहे. हा पूल अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचा आहे. मुंबईतील मालाड भागात मागच्या रस्त्यावर एका नाल्याच्या वर ते ठेवण्यात आले होता.
मुंबई : अभिनेता मकरंद अनासपुरे याचा एक चित्रपट आहे जाऊ तिथं खाऊ. त्या चित्रपटात प्रशासनाच्या भोंगळ कारभार उघड करताना विहिर चोरीला गेल्याचे दाखवण्यात आलं आहे. असाच काहीसा प्रकार मुंबईत झाला आहे. जेथे चक्क पूलच गायब झाला आहे. मात्र पोलीसांच्या सतर्कतेमुळे चोरांना बेड्या पडल्याने हा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत चोरट्यांनी 90 फूट लांबीचा लोखंडी पूल चोरून नेला. या पुलाचे वजन 6 हजार किलो होते. चोरट्यांनी आधी हा पूल गॅस कटरने कापला आणि नंतर तो ट्रकमध्ये नेला. बांगूर नगर पोलिसांनी ट्रकच्या नोंदणी क्रमांकावरून 4 जणांना अटक केली आहे. हा पूल अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचा आहे. मुंबईतील मालाड भागात मागच्या रस्त्यावर एका नाल्याच्या वर ते ठेवण्यात आले होता.
तपासादरम्यान पोलिसांना कळले की ब्रिजला 6 जून रोजी शेवटचे पाहिले होते. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या मदतीने आरोपीला पकडले. 11 जून रोजी एक मोठा ट्रक पुलाकडे जाताना दिसला. पोलिसांनी ट्रकच्या नोंदणी क्रमांकावरून त्याचा माग काढला. तर सत्य उघड झाले आहे. पुलाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यानेच चोरीची घटना घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या पोलिसांनी आरोपीसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली असून पुलाचा मालही जप्त करण्यात आला आहे